विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी आणि बारावी पेपरच्या तारखा जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक..

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ मध्ये होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांना अंदाजे ४५ लाख विद्यार्थी बसणार असून, भारतासह २६ परदेशी केंद्रांवरही या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १०वीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६रोजी सुरू होतील आणि 6 मार्च 2026 पर्यंत चालतील. या कालावधीत विद्यार्थ्यांचे भाषा विषय, मुख्य विषय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या चाचण्या घेण्यात येतील.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देखील १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होतील आणि ९ एप्रिल २०२६पर्यंत चालतील. या परीक्षेत एकाच शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका दिली जाणार असून, परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरू होईल.

दरम्यान, सीबीएसईने स्पष्ट केले आहे की या तारखा तात्पुरत्या आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांची अंतिम यादी सादर केल्यानंतरच अधिकृत वेळापत्रक प्रकाशित करण्यात येईल. या प्राथमिक तारखा विद्यार्थ्यांना आणि पालकांना नियोजन करण्यासाठी दिल्या आहेत.
बोर्डाच्या मते, वेळेवर निकाल जाहीर करता यावा यासाठी परीक्षेच्या तारखा पुढे-पुढे न ढकलता नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे निकाल वेळेत मिळाल्याने पुढील प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.