शेतात जायला रस्ता नाही म्हणून केला आत्मदहनाचा प्रयत्न, बारामतीत धक्कादायक प्रकार…!

बारामती : बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. निरावागज येथे ही घटना घडली आहे. याचे कारण देखील समोर आले आहे. या व्यक्तीने शेतात जायला रस्ता मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
यामुळे पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करताना परिसरात मोठा गोंधळ झाला होता. या सगळ्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी कुटुंबियांनी देखील आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या घटनेची चौकशी केली जाणार आहे. दत्तात्रेय शिवाजी भोसले असे या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, शेतातील रस्त्याच्या प्रश्ना बाबत होत असलेल्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल न घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बारामतीमध्ये ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.