सैफ अली खान यांच्यावर हल्ला प्रकरण! पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती, कोण होते हल्लेखोर?

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सूरू केला आहे. अशात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.सीसीटीव्हीच्या तपासणीत पोलिसांना दोन संशयित सापडले आहे. या संशयितांचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे.पोलिसांनी या घटनेनंतर सैफच्या घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.यावेळी सीसीटीव्हीत पोलिासांना दोन संशयित सापडले आहेत. या दोन संशयितापैकी एकाने सैफवर हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे. या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी याआधी सैफच्या घरातील तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर घरात फ्लोअर पॉलिशिंग करणाऱ्या कामगारांना पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.या सर्वाची सध्या चौकशी सूरू आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे.त्याचसोबत १५ टीमकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दूध देणाऱ्यांपासून ते पेपर टाकणाऱ्या सगळ्यांची चौकशी पोलिसांकडून सध्या सूरू आहे.