भाजपची संघटनात्मक पातळीवर पै. संदिप भोंडवे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रदेश क्रिडा आघाडीच्या संयोजकपदाची जबाबदारी..!!

उरुळी कांचन : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांची महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडीच्या संयोजकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भोंडवे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पै. संदिप भोंडवे यांनी यापूर्वी राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या अंतर्गत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, कुमार वयीन कुस्ती स्पर्धा तसेच युवती कुस्ती स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्गातून राष्ट्रीय पातळीवर पैलवान प्रशिक्षित केले आहे.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष पै. संदीप भोंडवे म्हणाले, “पक्षाने विश्वास दाखवुन माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडील असे ते म्हणाले .