Assembly Election Result 2023 : चारही राज्यांचे कल हाती, कुणाला किती मिळाल्या जागा?, जाणून घ्या..


Assembly Election Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांचे निवडणूक कल आता पूर्णपणे समजले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. त्यामुळे सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मेघालय सोडून इतर चार राज्यांचा आज निकाल असून मेघालयची मतमोजणी सोमवारी होणार आहे.

सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजप मध्य प्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. Assembly Election Result 2023

म्हणजेच राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा क्रम यंदा सुरु राहिला आहे. काँग्रेससाठी तेलंगणातून चांगली बातमी आहे. तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्टेंकी टक्कर सुरु आहे.

राजस्थानमध्ये एकूण १९९ जागांवर मतदान झाले त्यापैकी १०६ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांपैकी भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.

तसेच छत्तीसगडमध्ये ९० जागांवर मतदान झाले असून १५ वर्षांनी काँग्रेस सत्तेत आलीआहे. काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला फक्त सहा जागा मिळू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!