पुणे (हवेली) बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा होताच संचालक मंडळाचा एक गट सहलीवर! दोन प्रबळ इच्छुकांमुळे सभापदीपदाची उत्सुकता वाढली…


जयदीप जाधव                                              उरुळीकांचन : आशिया खंडात कृषी उत्पन्नात अग्रगण्य असणाऱ्या व सद्यस्थितीत अनियमित कारभाराने पणन विभागाच्या चौकशी फेऱ्याच्या रडावर असलेल्या पुणे (हवेली)कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दबावातून बाजार समितीचे पहिले सभापती दिलीप काळभोर यांनी सोमवारी (दि.७) रोजी आपला सभापतीपदाचा राजीनामा सूपूर्त केल्यानंतर बाजार समितीच्या नव्याने होणाऱ्या सभापतीपदी मनोमिलनाची शक्यता असतानाच सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून सभापतीसाठी एका गटाने आपले ११ संचालक सहलीवर नेऊन संचालकांची विशेष काळजी घेण्याची दक्षता घेतल्याने सभापतीपदी पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी संचालक मंडळात गेली वर्षभरापासून दुफळी पडलेल्या दोन गटातील नेतेमंडळींनी एकत्र येत सभापती दिलीप काळभोर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. सभापतीपदासाठी गेल्या वर्ष भरापूर्वी एका गटाने अविश्वास ठराव आणून सभापतीपदासाठी फिल्डींग लावली होती. मात्र दुसऱ्या गटाने परदेशात वारी करीतहा प्रयत्न असफल ठरविला होता.

 

या स्पर्धेत सभापतीपदासाठी जिल्हातील नेतेमंडळींनी दिलेले शब्द फोल ठरवित संचालकांनी आपसातील मनसुबे साध्य करुन घेतले होते. मात्र आता सर्वच संचालक मंडळात दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद यांच्या सूचनेप्रमाणे नवीन सभापती होईल अशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्यानंतर नवीन सभापतीची निवड निश्चित झाली असताना त्याच रात्रीत संचालक मंडळाचा एक गट ११ संचालकांसह पर्यटनस्थळी हवापाणी बदलण्यासाठी दाखल झाला आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी १८ जुलैच्या निवडीआधीच हवेली तालुक्यात स्पर्धा तीव्र झाली आहे.

 

दोन वर्षापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनेलने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पॅनेलचा पराभव करीत बाजार समिती ताब्यात घेतली होती. मात्र वर्षांनंतर झालेल्या कारभारात संचालक मंडळात प्रचंड हवेदावे होऊन बाजार समितीच्या संचालक मंडळाचा अनियमित कारभार हा पणन विभागाच्या रडावर आला आहे. अनियमित कारभाराची चौकशी होऊन चौकशी अहवाल कारवाईसाठी प्रतिक्षेत आहे. चौकशी मागणीवरुन संचालक मंडळ हटविण्याची मागणी एका पुण्यातील मंत्र्याने केली आहे. तसेच बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत रुपांतर करण्याची कार्यवाही शासन विचारधीन आहे. मात्र अडथळ्यांची शर्यतीत संचालक मंडळ टिकविणे गरजेचे असताना संचालक मंडळात सभापतीपदावरून तीव्र स्पर्धा हवेलीत रंगली आहे.

दोघांची प्रबळ दावेदारी!

बाजार समितीच्या सभापतीपदासाठी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी मिळेल म्हणून वर्षभर बाजार समितीत कुरघोडी झाली आहे. त्याचे तीव्र परिणाम यशवंत कारखान्याच्या निवडणु कीत होऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचे स्वप्न भंगले आहे. आता पुन्हा सभापतीपदासाठी प्रबळ दावेदारी निर्माण झाली आहे. यापूर्वी सभापतीपद भूषविलेले प्रकाश जगताप व रोहिदास उंद्रे यांनी दावा ठोकल्याने निवडणूक चर्चेत आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!