पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडे यांनी केला अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
अशातच आता एका कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधीवर बोलताना अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेचा शपथविधी घेण्यापूर्वी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू होतं, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.
पहाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये, अशी मी हात जोडून विनंती केली होती. पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.
या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केले आहे.