३१ तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टी अजित पवारांवर संतापले…

पुणे : काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्च च्या आधी कर्ज भरा, कर्जमाफी होणार नाही, असं वक्तव्य केले होते. यावर आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. ३१ तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातंय. नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का? असा सवाल करत शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार टीका केला.
यावर आता अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राजू शेट्टी म्हणाले, गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता, तुम्ही अत्यावश्यक झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार? 2029 सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल, असेही ते म्हणाले.
काल अजित पवार म्हणाले, मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मात्र तसे काही होणार नाही.
मी राज्यातल्या जनतेला सांगतो ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते. ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगून कर्जमाफी होणार नाही, असे म्हंटले होते.