उन्हाळ्यात घराबाहेर पडताना मास्क वापरताय? निर्माण होऊ शकतो धोका, जाणून घ्या सविस्तर…


पुणे : उन्हाळा सुरू असनू अनेकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच आपला चेहरा आणि डोके झाकण्यासाठी स्कार्फ किंवा मास्कचा वापर करताना दिसतात. विशेषतः उन्हाचा त्रास आणि त्वचेच्या टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी हा उपाय केला जातो.

मात्र डॉक्टरांच्या मते, योग्य कपड्याचा वापर न केल्यास याचे दुष्परिणामही संभवतात. त्यामुळे तोंड झाकताना कोणती काळजी घ्यावी, याकडे दुर्लक्ष करू नये. उन्हाळ्यात त्वचेच्या ऍलर्जी आणि श्वासाच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ होते.

विशेषतः रंगीत स्कार्फ किंवा स्वच्छ न ठेवलेले मास्क यामुळे चेहऱ्यावर पुरळ, डाग, बुरशी आणि केसगळतीसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोणताही कपडा चेहऱ्यावर बांधण्याआधी त्याची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासली पाहिजे.

मास्क वापर फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या..
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आरोग्यासाठी आवश्यक असलं तरी त्याचा दीर्घकाळ आणि सतत वापर काहीवेळा श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत ठरतो. मास्कमुळे शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड पुन्हा शरीरात श्वासावाटे जातो आणि यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते.

त्यामुळे, मास्क किंवा स्कार्फचा वापर फक्त गरज असताना, म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रदूषण असलेल्या भागात करावा. एकटे असताना किंवा उघड्या जागेत असताना त्याचा वापर टाळावा, असे डॉक्टर सुचवतात.

कोणते कपडे सुरक्षित? कोणते टाळावेत? जाणून घ्या..

उन्हाळ्यात चेहरा झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचे, हलक्या वजनाचे आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे कपडे त्वचेसोबत सुसंगत असतात आणि घाम सहजपणे शोषून घेतात.

दुसरीकडे, रंगीत कपडे, विशेषतः कमी दर्जाचे, यामधील रसायनं त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. अनेक वेळा हे कपडे बॅगमध्ये ठेवले जातात, ज्यामुळे त्यामध्ये बुरशी वाढते आणि त्यामुळे त्वचेच्या आजारांना आमंत्रण मिळते.

याशिवाय, जुने दुपट्टे किंवा वापरलेले कपडे पुनः वापरण्याआधी स्वच्छ धुणं आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे की, चेहरा झाकण्यासाठी वापरलेले कपडे दररोज धुवावेत आणि कोरडे ठेवावेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group