परदेशी शिष्यवृत्तीसाठी सोमवारपासून अर्ज करा, ‘या’ संकेतस्थळावर माहिती उपलब्ध…
पुणे : मराठा किंवा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना अखेर जाहीर झाली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून ( सारथी) महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्तीची अर्जप्रक्रिया सोमवारपासून (ता. १४) सुरू करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठीही शिष्यवृत्ती प्रदान करणार आहे. उमेदवारांना सोमवारपासून एक सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतील.
‘सारथी’च्या पुण्यातील आगरकर रस्त्यावरील कार्यालयात चार सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करावे लागतील, अशी माहिती अशोक काकडे यांनी दिली.
एकूण आठ अभ्यासक्रमांसाठी ७५ विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. ‘सारथी’ ने संकेतस्थळावर निवड आणि गुणवत्ता यादी तयार करण्याचे निकषही प्रसिद्ध केले आहे.
संकेतस्थळ https:// sarthi-maharashtragov.in/