मोठी बातमी! पुण्यात चिंता वाढली, GBS संशयित रुग्णाचा मृत्यू, केंद्र सरकारने उचलले मोठं पाऊल…


पुणे : पुणे शहरातील नागरिक सध्या एका दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे अनेक रुग्ण सापडत आहेत. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या तीव्र मोटर अ‍ॅक्सोनल न्यूरोपॅथी प्रकारामुळे पहिला मृत्यू झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, पिंपरीच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट-यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 64 वर्षीय महिला रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यामुळे आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रकरणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्यानंतर हा पहिलाच मृत्यू आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत महिलेला उच्च रक्तदाब असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गुईलन बारी सिंड्रोमचे (GBS) आणखी सहा रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. यामुळे यावर आता उपाय करणे आवश्यक आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेनंतर सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी डॉक्टरांच्या पथकाला स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संख्या वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात सध्या 14 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

दरम्यान एकूण 73 रुग्णांपैकी 44 रुग्ण ग्रामीण पुण्यातून, 11 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातून, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून आहेत. तसेच सर्वाधिक 14 रुग्ण हे किरकीट वाडी येथील आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!