बारामतीत पुन्हा भीषण अपघात! पत्रकार आजोबांचा अपघातात मृत्यू, चिमुकली खेळाडू गंभीर जखमी..

बारामती : बारामती निरा रस्त्यावर शारदानगर येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका पत्रकार आजोबांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात सकाळी पावणे सात वाजता बारामती निरा रस्त्यावर शारदानगर येथे झाला आहे.

राजेंद्र दिनकर भागवत (वय 59 वर्ष रा. रा. गोखळी ता. फलटण) असे आपघातात मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव असून अनेक राष्ट्रीय रेकॉर्ड केलेल्या स्वरा भागवत ही नात यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीत उपचार सुरू आहेत. राजेंद्र भागवत हे फलटण मधील जेष्ठ पत्रकार होते.
मिळालेल्या माहिती नुसार, माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता बारामती निरा रस्त्यावर शारदानगर मध्ये हा अपघात झाला. बारामतीकडून निरेकडे बस निघाली होती. त्याचवेळी आपल्या नातीला शारदानगर येथे सोडण्यासाठी राजेंद्र भागवत हे स्वराला घेऊन दुचाकी वर आले होते.

त्यांची दुचाकी माळेगाव कडून शारदानगर कडे वळत असताना समोरून आलेल्या भरधाव बसने जोरदार धडक दिली. यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने राजेंद्र भागवत यांचा मृत्यू झाला तर स्वरा ही देखील या घटनेमध्ये जखमी झाली.
दरम्यान, तिला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आले आहे. एका महिन्यात सातत्याने वारंवार होत असलेल्या या अपघाताच्या घटनांमुळे बारामतीकर मात्र हादरले आहेत.