बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कसलेचा अजून एक मोठा कारणामा उघड, 10 लाख कुठून आले? आता माहिती आली समोर…


बीड : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने धनंजय मुंडे यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. यामुळे ते चर्चेत आले. असे असताना आता याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, आता हे पैसे कुठून आले याबाबत माहिती समोर आली आहे.

ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात अजून धक्कादायक माहिती समोर येईल.

याबाबत काळे म्हणाले की, रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे आपली त्याच्याशी ओळख झाली. मागील वर्षी रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फी ची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारीने मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले.

त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली. यामुळे मी तक्रार करणार असे त्याला सांगितले होते. त्याने थोडे थोडे करून साडे सात लाख रुपये परत दिले आहेत.

आता उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!