आणखी एका विमानाचा अपघात; टेक ऑफआधीच विमान दुर्घटनाग्रस्त, नेमकं काय घडलं?


सोलापूर : महाराष्ट्रात विमान अपघातांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. बारामती विमानतळावर अलीकडेच दोन विमान अपघातांच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर असताना अचानक नियंत्रण सुटून ते धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टेक ऑफ करताना विमान धावपट्टीवरून घसरले

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर एका शिकाऊ विमानाचे उड्डाण सुरू असताना हा प्रकार घडला. शिकाऊ वैमानिक महिला विमानाचे टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. मात्र, विमान धावपट्टीवरून पुढे जात असतानाच ते धावपट्टीच्या खाली घसरले. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली.

महिला वैमानिक सुखरूप

या अपघातात विमानातील महिला शिकाऊ वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. ती सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाचा हा अपघात असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, विमान धावपट्टीवरून नेमके कोणत्या कारणामुळे घसरले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

विमानतळ प्राधिकरणाकडून माहितीची प्रतीक्षा

या घटनेनंतर सोलापूर विमानतळावरील अपघाताची चर्चा सुरू झाली आहे. विमान धावपट्टीवरून घसरण्यामागचे नेमके कारण काय, तांत्रिक बिघाड झाला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून या घटनेबाबत अधिकृत सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!