मोठी बातमी! भोंदू मनोहरमामाचा अजून एक कारणामा समोर, आता भिगवणच्या दत्तकलेचे झोळ यांच्यासोबत पैशांचे कनेक्शन, झोळ फरार…


कुर्डुवाडी : अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्यासह त्याला मदत करणाऱ्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम ३(२), ३(३) आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोहर ऊर्फ ‘मामा’ भोसले याच्यावर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी विशेष एसआयटी पथकाची स्थापना केली आहे.

तपासादरम्यान मनोहर भोसले याने अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या पैशांच्या व्यवहारात दौंड येथील स्वामी चिंचोलीमधील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, संस्थेमध्ये आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे यांना अटक करण्यात आली असून, दोघांनाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर रामदास झोळ याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दत्तकला इन्स्टिट्यूटमधून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी असलेले रजिस्टर, संगणक आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!