रेल्वेत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना! डब्यांना लागली भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी…


चेन्नई : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अन्य २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मदुराई रेल्वे स्थानकाजवळील बोडी लेन येथे उभ्या असलेल्या पर्यटक ट्रेनला शनिवारी पहाटे आग लागली.

अनेक वृत्तांत असा दावा केला जात आहे की काही प्रवासी गॅस सिलिंडर घेऊन आले होते. यामुळे ट्रेनच्या डब्याला आग लागली. काही वेळातच आग मोठी होऊ लागली.

मिळालेल्या माहिती नुसार, दारायल मदुराई स्टेशनवर पर्यटक ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनच्या काही प्रवाशांनी डब्यात चहा बनवायला सुरुवात केली. त्यानंतर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. प्राथमिक अहवालानुसार ८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!