Anil Deshmukh : ‘ते फोन करत आहेत, पण आता…!! अजित पवारांच्या आमदारांबाबत अनिल देशमुखांचा मोठा दावा

Anil Deshmukh : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.
महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तसेच लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबतच्या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
यानंतर आता शरद पवार गटाच्या अनिल देशमुख यांना खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार गटातील आमदार संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, आता त्यांना परत घ्यायचा नाही असं ठरलं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, जे आम्हाला सोडून गेले त्यांची आता चलबिचल झाली आहे. त्यांना राजकीय भवितव्य नाही, वर्षभरापूर्वी त्यांचा निर्णय चुकला आहे. चार महिन्याने निवडणूक असल्याने त्यांना आता चिंतेनं ग्रासले आहे. Anil Deshmukh :
जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. मात्र, ते सगळे शरद पवारांना कठीण काळात सोडून गेले. वैयक्तिक टीका केली, ते आमच्या डोक्यात असल्याचंही ते म्हणाले.