बायको माहेरी गेल्याचा आला राग, नवऱ्याने थेट पेट्रोल टाकूनच स्वतःला पेटवलं, घटनेने सगळेच हादरले…


बिहार : पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पतीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रक्रर समोर आला आहे. बिहारच्या चंपारण जिल्यातील नरकटियागंजच्या शिकारपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामपूर गावात हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तरुणाचे नाव रामबाबू चौधरी (वय. २८) असे आहे. तो बगाहा येथील रहिवासी होता.

मिळालेल्या माहिती नुसार, पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पती रागावला होता. बुधवारीही नवरा बायकोमध्ये भांडण झालं होतं. नंतर ती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. रामबाबू आपल्या पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी सासरी गेला होता.

त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्याच्यासोबत परत येण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून तरुणाने त्याच्या दुचाकीतून पेट्रोल काढले. प्रथम त्याने दुचाकीवर पेट्रोल शिंपडले आणि आग लावली. मग त्याने स्वतःच्या शरीरालाही पेटवून घेतलं.

तरुणाला जळताना पाहताच सासरच्या लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.नंतर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. तरुणावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!