Anantnag Encounter : अनंतनागमध्ये चौथ्या दिवशीही चकमक सुरूच, लष्कराने दहशतवाद्यांवर रॉकेट लाँचरसह केला बॉम्बचा हल्ला..

Anantnag Encounter : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये (Anantnag Encounter) सध्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. येथील कोकरनागमध्ये आज शनिवारी (ता.१६) सलग चौथ्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. (Anantnag Encounter)
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, कोकरनागच्या जंगलात २-३ दहशतवादी लपून बसले आहेत, ज्यांना भारतीय लष्कराने घेरले आहे. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी त्यांच्यावर रॉकेट लाँचर आणि इतर जड शस्त्रांनी हल्ले केले जात आहेत.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कर डोंगरावर ड्रोनने बॉम्बफेक करत आहे. रॉकेट लाँचरमधून बॉम्बफेकीचा व्हिडीओही समोर आला आहे.घनदाट जंगल आणि टेकड्या मध्यभागी संशयित लपलेल्या ठिकाणी दहशतवादी तपासासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला
दोन्ही बाजुंनीही गोळीबार सुरू आहे. सांगितले जात आहे. दहशतवादी एका टेकडीवर गुहेत लपलेले आहेत. कोकरनागच्या गडुल जंगल परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला. टेकडीभोवती फास घट्ट करण्यात आला. त्यानंतरही हा गोंधळ सुरूच आहे.