अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला ठोकरल्याने पादचारी ठार ;कोरेगाव मूळ हद्दीत दुर्दैवी घटना…!


उरुळी कांचन : पुणे-सोलापूर मार्गावर वाहनांची अपघाताची मालिका सुरु असतानाच एका पादचारी तरुणाला अज्ञात वाहनाने उडविले असल्याची बातमी समोर आली आहे . यामुळे नागरिकांमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले आहे .

पुणे-सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्तीजवळ एका पादचारी तरुणाला पाठिमागून आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्य झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी झाला आहे.

गौतम विश्वनाथ गायकवाड (वय २६,उत्तर सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकाश गायकवाड (वय २७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा चुलत भाऊ गौतम हा मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास इनामदार वस्तीजवळून महागार्ग रस्त्याने पायी चालत जात होता. यावेळी पाठिमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची खबर न देता पसार झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!