Amravati : एकीला अटक तर एकाचे निलंबन, एकाच जिल्ह्यात दोन तहसीलदारांवर कारवाई, नेमकं काय घडलं?

Amravati : शेतकऱ्याचा फेरफार निश्चित करण्यासाठी तहसीलदार 25 हजाराची लाच मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच दुसरीकडे रद्द झालेले लेआउट पुन्हा निश्चित करण्यासाठी तहसीलदारच धडपडत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अमरावती जिल्ह्यात दोन तहसीलदारांवर कारवाई झाली. चांदूरबाजारची तहसीलदार गीतांजली गरड हिला 25 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व अटक केली. तर दुसरीकडे अमरावती तालुक्याचा तहसीलदार विजय लोखंडे याला आयुक्तांनी रद्द केलेली लेआउटची शिफारस पुन्हा कायम केल्यावरून शासनाने निलंबित केले आहे.
यामुळे या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, गीतांजली गरड यांनी तहसील कार्यालयात वावरणारा खाजगी व्यक्ती किरण दामोधर बेलसरे (२९, रा. शिरजगाव बंड) याच्यामार्फत तक्रारकर्त्याकडे पैशांची मागणी केली होती. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. Amravati
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसीलदार गीतांजली गरड व किरण बेलसरे यांना तहसील कार्यालयातून अटक केली. यामुळे सगळेच हादरले आहेत. याआधी देखील तहसील कार्यालयात असणारा लिपिक किरण बेलसरे याने तहसीलदारासाठी व स्वतःसाठी मिळून 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली आणि लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तसेच अमरावती तालुक्याचा तहसीलदार विजय लोखंडे याला थेट महसूल विभागानेच निलंबित केले आहे. अमरावतीच्या गोपाळ नगर भागातील संजय गव्हाळे यांनी त्याच्यासाठी तक्रार केली होती.
दोन लेआउट महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी रद्द केले होते, मात्र मागील वर्षी रद्द केलेले हे लेआउट लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी एक दिवस पुन्हा मंजुरीसाठी सहाय्यक संचालकांकडे मांडले होते. यात विजय लोखंडे दोषी आढळल्याने त्याला निलंबित करण्यात आले.