Amol Kolhe : कोल्हेंचा अजितदादांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले पवारांनी मला मांडीवर घेऊन मंत्रीपद…


Amol Kolhe : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता दोन दिवस राहिले आहे. प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रॅली काढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर बोचरा वार केला आहे. मी जर तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल असे सांगत मला शरद पवारांनी मला मांडीवर घेऊन अनेक मंत्री पदे दिली नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे.

पुण्यातील आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार सभेत हजेरी लावली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले की, अजितदादा आपल्या विरुद्ध बरेच बोलले आहेत. आज दुपारी बारामतीला सभा आहे.

माझ्या मतदारसंघात मी त्यांना उत्तर देणार नाही तर तुमच्या मतदार संघात येऊन उत्तर देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. ‘इलाका तुम्हारा धमाका हमारा है असेही कोल्हे यांनी म्हटले. Amol Kolhe

मी जर तोंड उघडलं तर अनेकांची अडचण होईल असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हे यांनी म्हटले की, खासदारांना कळत नाही म्हणाऱ्यांना सांगतो की पवार साहेबांनी मला मांडीवर घेऊन अनेक मंत्री पदे दिली नाहीत. शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पिंजून काढले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवारांचा काही नेम नसून महाराष्ट्र सरकार तो झाँकी है, केंद्र सरकार बाकी है असं म्हणत आगामी राजकीय घडामोडींबाबत भाष्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!