Amitesh Kumar : पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस आयुक्तांचे फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न, अमितेश कुमार काय म्हणाले? जाणून घ्या..
Amitesh Kumar : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आपल्या व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपला स्टेटसमध्ये माझ्या फोटोचा गैरवापर करुन नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्ट किंवा मेसेजला रिप्लाय करु नका अशी विनंती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. Amitesh Kumar
आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करुन सोशल मीडियावर पैसे मागितले जात असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपला स्टेटसमध्ये अशा गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन नागरिकांना केले आहे.
अमितेश कुमार यांनी दिली माहिती…
माझ्या फोटोचा वापर करुन कोणीतरी पैशांची मागणी करत आहे. कोणीही याला बळी पडू नका. पैसे देऊ नका किंवा अशा कोणत्याही रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करु नका. अशी माहिती त्यांनी दिली आहे.