चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी…!


हैदराबाद : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे . हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बी गंभीर जखमी झाले. अमिताभ ‘प्रोजेक्ट’ चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना ही घटना घडली.

अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. हैदराबादमध्ये उपचार घेतल्यानंतर हा जगप्रसिद्ध अभिनेता मुंबईतील त्याच्या घरी परतला आहे. यानंतर चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दिग्गज अभिनेत्याने ब्लॉकवर लिहिले की त्यांना शरीरात तीव्र वेदना होत आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!