पुण्यातील डॉक्टरांची कमाल! रक्तगट जुळत नसतानाही तरूणाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण, नेमका कसा केला हा चमत्कार?


पुणे : पुण्यातील डॉक्टरांनी कमाल केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. याठिकाणी आई आणि मुलाचा रक्तगट भिन्न असतानाही पुण्यातील डॉक्टरांनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करून या तरुणाला जीवनदान दिले. बांगलादेशातील तरुणाला किडनीचा आजार झाल्याने तो उपचारांसाठी पुण्यात आला होता.

यावेळी किडनी प्रत्यारोपण एकमेव मार्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तरुणाच्या आईने किडनी देण्याची तयारी दाखवली. मात्र, रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण यशस्वी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. असे असताना ही शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली आहे. बांगलादेशमधील 31 वर्षीय तरुणाला किडनीचा त्रास असल्याने तो पुण्यातील ‘नोबल हॉस्पिटल’ मध्ये दाखल झाला होता.

या तरुणाला आयजीए नेफ्रोपॅथी बर्जर्स डीसीज हा आजार असल्याचे निदान झाले. आयजीए नेफ्रोपॅथी या दुर्मीळ स्थितीत शरीरातील रोगप्रतिकारशक्ती प्रतिपिंड अँटीबॉडी तयार करते. यावर प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग होता. असे असताना एक अडचण होती. या रुग्णाच्या कुटुंबात केवळ आई मूत्रपिंड दान करू शकत होती.

रुग्णाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आणि आईचा एबी पॉझिटिव्ह होता. बी पॉझिटिव्हसाठी ‘बी’ किंवा ‘ओ’ रक्तगट असलेले दाते असणे गरजेचे होते. रक्तगट जुळत नसताना प्रत्यारोपण केल्यास शरीर नवीन अवयव नाकारण्याची जोखीम असते. यामुळे यामध्ये सगळं काही यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी असते.

याबाबत नोबल हॉस्पिटल’चे प्रत्यारोपण चिकित्सक डॉ. अविनाश इग्नाशिअस यांनी सांगितले की, रुग्णाच्या प्रतिपिंडाच्या बाबतीत चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊन प्रतिपिंड निर्माण करण्याची क्षमता कमी करण्यात आली. तसेच रक्तातील सद्यस्थितीतील प्रतिपिंड शरीराबाहेर काढण्यासाठी प्लाझ्मा फेरेसिस ही प्रक्रिया करण्यात आली.

तसेच यावेळी प्रत्यारोपणाच्या पूर्ण प्रक्रियेत शरीर नवीन अवयव नाकारणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे ही जोखीम होती. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेण्यात आले, यामुळे ही अवघड असलेली प्रक्रिया यशस्वी झाली. हा तरुण आता ठणठणीत असून त्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या चमत्कारामुळे डॉक्टरांचे आभार मानले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!