रविवारी पुणे लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द, कामशेत तळेगाव रेल्वेचा पॉवर ब्लॉक, जाणून घ्या…


पुणे : पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या फेऱ्या दिवसभर सुरू असतात. आता या मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान येत्या रविवार (दि. ५) रोजी पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे वेळापत्रक बदलणार असून अनेक गाड्या वेगळ्या वेळेत सोडण्यात येणार आहेत.

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत हा पॉवर ब्लॉक असणार आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. या वेळेत अप आणि डाउन मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांना १५ ते ३० मिनिटांचा ब्लॉक देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसमज होऊ शकते.

याबाबत माहिती अशी की, पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक घेण्यात येत आहे. या दिवशी होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे महत्वाची कामे असतील तर दुसरा मार्ग निवडावा लागणार आहे.

याठिकाणी १५ ते ३० मिनिटांपर्यंत रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत.
यामध्ये २२१५९ सीएसएमटी, मुंबई-एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस,
१७२२ लोकमान्य टिळक- काकीनाडा एक्स्प्रेस,
२२१९७ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस
१२१६४ एमजीआर- चेन्नई-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
१६३३२ तिरुवनंतपुरम- सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस
२२९४३ दौंड-इंदूर एक्स्प्रेस
पुणे-लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच ११०२९ सीएसएमटी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सीएसएमटी मुंबईहून ८.४० ऐवजी ११.१० वाजता सुटणार आहे.
१२४९३ मिरज-हजरत निजामुद्दिन मिरजहून ४.५० अस नियोजन असणार आहे. यामुळे हे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे. नाहीतर गैरसोय होईल.

तसेच ०१५६४ पुणे-लोणावळा
०१५६२ शिवाजीनगर-लोणावळा
०१५६१ लोणावळा-पुणे
०१५६३ लोणावळा-शिवाजीनगर
मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यादिवशी रविवारी असल्याने नोकरदार वर्ग जास्त प्रवास करत नाही. मात्र मोठ्या गाड्यात जास्त गर्दी असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!