अजितदादांचा शिलेदार हरपला! दोन टर्म आमदारकी गाजवलेल्या माजी आमदाराचं भल्या पहाटे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा…


जालना : शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दोन टर्म आमदारकी गाजवलेला अजित पवारांचा शिलेदार हरपला आहे. शुक्रवारी भल्या पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.

जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि परतूरचे माजी आमदार सुरशेकुमार जेथलिया यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जेथलिया यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेथलिया हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू, म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असून जिल्हयात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झालं. सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून 2009 साली नेतृत्व केलं. काँग्रेस पक्षानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात नेलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान जेथलिया यांच्या निधनाने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली असून जिल्ह्याच्या राजकीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!