अजितदादा देणार काकांना पुन्हा धक्का? शरद पवार गटाचे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर?, महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आता विधानसभा निवडणुकांपूर्वीत राज्यातील विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंगला वेग आला होता. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराबव झाल्यानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटालाही मोठी गळती लागल्याचे चित्र दिसून आले आहे.
ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यानी शिवसेना शिंदे गट, भाजपाच्या दिशेने वाटचाल केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक नेतेही बाहेर पडताना दिसले. त्यातच आता अजित पवार हे पुन्हा काकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच भाजप शिवसेना यांच्या विरोधात विधानसभेत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना अजित पवार ताकद देतील का, यावरून महायुतीतसुद्धा अंतर्गत संघर्ष वाढू शकतो.
मिळालेल्या माहिती नुसार, राहुल मोटेस राहुल जगताप , विजय भांबळे यांच्यासह अनेक जण शरद पवारांची साथ सोडून जाणार असल्याची चर्चा आगे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा येथून राहुल मोटे, तसेच अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप, आणि परभणी मधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे
दरम्यान, या नेत्यांना पक्षप्रवेश देण्यावरून अजित पवारांच्या पक्षाअंतर्गतच काहीसा विरोध दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या लोकांनी महायुती मित्र पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याच उमेदवारांना अजित पवार थेट पक्षात प्रवेश देणार असतील तर त्यामुळेही महायुतीत मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.