पुण्यात अजित पवारांची डोकेदुखी वाढली ; महापालिकेसाठी भाजपचा तगडा प्लॅन…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच पुणे महानगरपालिकेसाठी करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेच काम प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आलं आहे.भाजपने आपल्या राजकीय सोयीसाठी प्रभागांची तोडफोड करून नकाशा तयार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.भाजपकडून या निवडणुकीसाठी अजित पवारांचा प्रभाव असलेल्या वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा क्षेत्रातील शहरी भागात मोठे-मोठे प्रभाग करून राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी करण्याचा डाव खेळला जात आहे. त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे.
भाजप पुणे महापालिकेसाठी यावेळी कोणत्याही पक्षाशी युती करण्याच्या मनःस्थितीत नाही. स्वबळावर निवडणूक लढताना त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान राष्ट्रवादीचे असेल, हे भाजपला पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे प्रभाग रचनेतच राष्ट्रवादीची कत्तल करण्याची रणनीती आखण्यात आली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत,आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचं काम प्रशासनाच्या नावाखाली सुरू असलं, तरी सूत्र मात्र भाजपच्या नेत्यांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. मात्र या निवडणुकीत अजित पवारांचीं डोकेदुखी पुण्यात वाढणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान माजी नगरसेवकांच्या ताकदीत पाहिलं तर पुण्यात भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाची राष्ट्रवादी आहे. शिवसेना फुटल्यामुळे तिची ताकद पुण्यात आणखी कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप समोर खर आव्हान असणार आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच त्यामुळेच दादांच्या मजबूत गोटावर हल्ला चढवण्याचा भाजपचा डाव सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.