शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा ; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार’ इतकी’ रक्कम…


पुणे : राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड दौरा केला.बीडमध्ये या अतिवृष्टीने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. या पाहणीनंतर अजित पवार यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. त्यांना तात्काळ पाच हजार रुपये आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली. या संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ पाच हजार रुपये रोख आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान यावेळी अजित पवारांनी दौऱ्याला उशीर झाल्याबद्दल स्पष्टीकरण दिले. मी काल रात्रीच बीडमध्ये पोचलो. त्यामुळे पाहणी करण्यासाठी थोडा उशीर झाला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनीही विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले. या संकटातून नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!