बारामतीत विजयासाठी अजित पवार हे करतील,’ सुनंदा पवार काय म्हणाल्या हे बघा ?

बारामती : बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच लढत आहे. संपूर्ण देशाचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी संपूर्ण पवार कुटूंबिय मैदानात उतरले असताना आता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी एक वक्तव्य केले आहे.
त्या प्रचारादरम्यान बारामती येथील जळगाव सुपे येथे बोलत होत्या. बोलताना त्या म्हणाल्या की, “आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोकं दिसत आहेत. विविध भाषेत बोलणारी लोकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होण्याची शक्यता आहे,” असं वक्तव्य सुनंदा पवार यांनी केलेले आहे.
Views:
[jp_post_view]