गौतमी पाटीलबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना दिल्या सूचना…!


मुंबई : सध्या तरुणांच्या मनात फक्त गौतम पाटीलचा जलवा बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तिच्या डान्ससाठी तरुण वेडे झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन तरुण तिचा कार्यक्रम ठेवत आहेत.

असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता.

त्या म्हणाल्या, गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचे आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली. यानंतर अजित पवार यांनी लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!