Ajit Pawar : मोठी बातमी! राज्यात ‘या’ निवडणुका स्वतंत्र लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातून घोषणा…


Ajit Pawar : पुण्यात काल भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी, लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत.

मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतं.

पिंपरी चिंचवड,पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घाय्याचे होते, पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो.काही अफवा पसरवल्या जातात,पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत.

विकासासाठी आपण निर्णय घेतला,विरोध पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले,त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो. Ajit Pawar

उद्या नगर दौरा आहे,चार ठिकाणी कार्यक्रम आहे,उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले.

मात्र, त्यासोबतच, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी केली. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!