Ajit Pawar : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, पुण्यातील बडा नेता शरद पवार गटात जाणार..

Ajit Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे नेत्यांचे वळण सुरू आहे. विशेषतः पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक अनिल बाबा राक्षे शरद पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
तसेच महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्याकडे इच्छुकांचे प्रमाण वाढत आहे. कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी भाजपला धक्का देऊन इतर जागांवर चाचपणी सुरू केली आहे. महायुतीत उमेदवारीवरून नाराजी वाढल्याने अनेक नेते महाविकास आघाडीकडे वळत आहेत.
पुण्यातील खेड तालुक्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे, ज्यामध्ये अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल बाबा राक्षे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Ajit Pawar
राक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांच्याशी भेटी घेतली आहे. अशा स्थितीत, अनिल बाबा राक्षे शरद पवार गटात सामील होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राक्षे खेड आळंदी विधानसभा क्षेत्रात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने, त्याच्या शरद पवार गटाशी भेटीगाठी वाढल्याने महायुतीला याचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.