‘ती’ एक गोष्ट करणार आणि दाखवून देणार की आमचा निर्णय योग्यच, अजित पवार यांचे मोठे वक्तव्य..


पुणे : भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय योग्य होता हे लोकांना पटवून देऊ आणि टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठीही उपाययाजना करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार आज पुण्याच आहेत. पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. काही वेळा आधी अजित पवार यांच्या हस्ते १०६ फुटी ध्वजाचा लोकार्पण झाले. यावेळी राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार चेतन तुपे हेदेखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ते पुढे म्हणाले, लोक आमच्यावर टीका टिपण्णी करत आहेत. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र कामातून आम्हाला दाखवून द्यायचं आहे की, आमचा निर्णय किती चांगला होता. येत्या काळात हे दाखवून देऊ, असे अजित पवार म्हणाले. उद्याचं भविष्य या तरुणांच्या हातात आहे.

त्यामुळे त्यांना चांगले घडवण्याचे काम करूया. महापालिका निवडणुका लागल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत. एकनाथ शिंदे , फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

मी कामाचा माणूस आहे. कामातून लोकांना उत्तर देणार आहे. सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. ती सोडवण्यासाठीही उपायोजना करणं गरजेचं आहे, असे अजित पवार म्हणाले.

पुणे आणि पिंपरी आणि ग्रामीणच्या समस्या सोडवन्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे. अधिकाऱ्यांना सध्या कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे. कामं झाली पाहिजेत.

अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कुणी चुका केल्या तर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येईल. कुणाची गय केली जाणार नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

झोपडपट्टी विरहित शहर करण्याचे काम आम्ही करत आहोत. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. राज्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काम करताना जातीयसलोखा ठेवण्याचं काम करतो आहोत. अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटणार नाही, याचीही काळजी घेतोय, असे पवार म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!