Ajit Pawar : अजित पवारांचे गोपीचंद पडळकर यांना जोरदार उत्तर, म्हणाले, मलाही बोलता येतं पण….
Ajit Pawar : पुणे : मलाही बोलता येते. पण अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. हे लोक म्हणजे वाचाळवीर आहेत. यांना मी एवढंच म्हणेन विनाशकाले विपरित बुद्धी!, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना भर पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा समाचार घेतला आहे.
अजित पवार हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहेत. त्यांना आम्ही मानत नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या बातम्या चालल्या आहेत. या गोष्टीला आता १४ महिने झाले आहेत. प्रत्येक यंत्रणा काम करते आहे.
या बातम्यामध्ये काही अर्थ नाही. जो पर्यंत कुठला निकाल नाही. तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा विचारच नाही. मी फक्त विकासासाठी काम करतो. केवळ विकास हेच आमचं ध्येय आहे, असंही अजित पवार म्हणाले.