अजित पवार यांच्या सभेनंतर शिरुर-हवेलीत महायुती रिचार्ज ! माऊली कटकेंच्या विजयासाठी महायुतीची वज्रमूठ ..!!
उरुळीकांचन : राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या लोणीकाळभोर येथे शनिवार( दि.९) रोजी शिरुर-हवेलीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेनंतर हवेली तालुक्यात महायुतीचे पक्षसंघटन पूर्ण चार्ज झाले आहे. राष्ट्रवादी-भाजप तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते या सभेनंतर पूर्णतः हा जोमाने माऊली कटके यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी सभेत शिरुर-हवेली मतदारसंघात निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे सांगून प्रदिप कंद यांच्या भविष्यावर संधी देण्याचे भाष्य केल्याने महायुती शिरूरमध्ये चांगलीच सुखावली असून माऊली कटके यांची जबाबदारी प्रदिप कंद उचलल्याने हवेलीत युतीची वज्रमूठ माऊली कटके यांना विजयाच्या समीप पोहचविणार
असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिरुर-हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली
कटके यांच्या प्रचारार्थ लोणीकाळभोर येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत अजित पवार यांनी मतदारसंघातील विजयासह स्थानिक समीकरणांना जुळविण्याचा कालमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अजित पवार यांच्या सभेत अजित पवार यांच्यासोबत पूर्वाश्रमिचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सभेला उपस्थिती लावून
शिरुर-हवेलीच्या विजयाचे समीकरणाची जुळवणूक केली आहे.
या सभेत अजित पवार यांनी राज्यभरात सुरू असलेली आक्रमक भाषा न वापरता स्थानिक प्रश्नांची कामे पुढील काळात अजेंडावर ठेवत निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या सर्व समीकरणांत भाजपचे मतदारसंघात तीव्र इच्छुक असलेल्या प्रदिप कंद यांनी आपल्याला या मतदारसंघात निवडून आणण्याचे हमी देऊन या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी आमंत्रित केले होते. या परिस्थितीत प्रदिप कंद यांचे नाव मागे पडले असले तरी अजित पवार यांनी प्रदिप कंद यांना भविष्यात संधी देणार असल्याचे सांगितल्याने भाजप कार्यकर्ते सुखावलेआहे या सभेनंतर भाजप पूर्ण तयारीत उतरली असून भाजपचे मजबूत संघटन प्रचारात उतरले आहे.
*माऊली कटकेंचं मोजक्या शब्दांत अभ्यासू भाषण*
अजित पवार यांच्या सभेत उमेदवार माऊली कटके यांनी मोजक्या शब्दांत अभ्यासपूर्ण भाषण केल्याची चर्चासभेनंतर झाली त्यांनी सभेत वैयक्तिक टिकेपेक्षा शिरुर-तालुक्यातील महत्वाचा प्रश्नांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले.घोडगंगा, यशवंतचा प्रश्न चाकसमानचे शिरुरला आवर्तन, हवेलीतील खडकवासलाचे आवर्तन ,वीजेचा प्रश्न, बंद रोहित्रांचा प्रश्न, नर्सरी व्यवसायात अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे पॉलिहाऊस,शेडनेट नुकसानासाठी भरपाईची नियमावलीत बदल ,शासकीय रुग्णालय गरज तसेच ट्राफिक समस्यासहीत वाढत्या नागरीकरणावर निधी वाढविण्याची मागणी केली आहे. या मोजक्या भाषणात अचूक मुद्दे मांडल्याने कटके यांच्या अभ्यासाची चूणूक भाषणात दिसली.