Ajit Pawar : विधानसभा तोंडावर अजित पवार अडकले, क्लीन चीटला विरोध करणाऱ्या याचिका दाखल…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूने दिलेल्या क्लीन चिटला विरोध करण्यात आला आहे. यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती.
मात्र याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेतच. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आलं आहे.
सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. Ajit Pawar
शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजित पवारांविरोधातील खटला बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ८० संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती.
त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यावर आक्षेप नोंदवला. तसेच याला विरोध करणाऱ्या चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर येत्या ५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.