Ajit Pawar : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले…

Ajit Pawar : राज्यात भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व विजयात ‘लाडकी बहीण’ योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याने महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे. मात्र, त्यातील एक-दोन निकष बदलले जाण्याची शक्यता आहे.
या योजनेतून दरमहा २,१०० रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केली होती. मात्र, तूर्तास १,५०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे संभ्रम दूर केले आहे.

अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ, असे उत्तर अजित पवार यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिले. दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. Ajit Pawar


अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळेस ते बोलत होते. बाबा आढाव पुण्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत. या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असावे, ही अट या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती. मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची चर्चा होती.
तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जात होते. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये योजनेचे निकष बदलणार का? अशी भीती होती. मात्र अजित पवार यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींची काळजी मिटली आहे.