Ajit Pawar : अजित पवार यांच्या जीवाला ‘या’ दोन शहरात धोका, महत्वाची माहिती आली समोर…

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा राज्यातील विविध भागांना भेटी देत असून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती लोकांची प्रचंड गर्दी होत आहे.
निवडणुकीआधी ते ग्राउंड रिॲलिटीला सामोरे जात आहेत आणि पक्ष मजबूत करण्यासाठी लोकांना भेटत आहेत. अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अहवालाने प्रशासनाची धांदल उडाली आहे.
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार अजित पवार यांच्या जीवाला धोका आहे. गुप्तचर विभागाने त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जिथे महिलांची मोठी गर्दी असते तिथे जाऊ नका असे त्यांना सांगण्यात आले आहे.
जीवाला धोका असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिथे जास्त महिला आणि गर्दी असते तिथे न जाण्याच्या सूचना मला देण्यात आल्या आहेत. असं अजित पवारांनी सांगितले आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
अजित पवार म्हणाले की, गुप्तचर विभागाने मला सांगितले आहे की, मी मालेगाव, धुळे सारख्या ठिकाणी गेलो तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र राज्यातील बहिणींनी मला राखी बांधली आहे.
जोपर्यंत राख्या या हातावर आहेत, तोपर्यंत मला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचे रक्षण आणि तुमच्या प्रेमाची ढाल मला कोणताही धोका स्पर्श करू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.