Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री क्षेत्र आळंदी येथील पद्मशाली समाज धर्मशाळेचे उद्घाटन…

समाजातील गरीब महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' लाभदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार


Ajit Pawar : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही क्रांतिकारक योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून समाजातील गरीब, वंचित घटकातील महिलांसाठी ही योजना लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर (भवानी पेठ) यांच्यावतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे नुतन पद्मशाली समाज धर्मशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार बापू पठारे, पद्मशाली पंच कमिटीचे विश्वस्त रविंद्र महादेव रच्चा, पद्मशाली पंच कमिटीचे सरपंच वसंत यमुल, पंच कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, समाजातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना वीज माफी, वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा, वारीतील दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान, वारकरी महामंडळ स्थापन करणे यासारखे महत्वपूर्ण निर्णय शासनाने आहेत. Ajit Pawar

देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांच्या बलिदानाचा सन्मान केला पाहिजे. राज्यात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पद्मशाली समाज मूळचा आंध्र प्रदेशातील असून महाराष्ट्रात ३०० वर्षापूर्वी स्थायिक झाला आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय विणकाम असून हा कष्टाळू समाज आहे. या समाजाने आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आळंदी येथे या समाजाने पद्मशाली समाज धर्मशाळेची देखणी वास्तू निर्माण केली आहे. त्याचा फायदा वारकऱ्यांना नक्कीच होईल. वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!