लेकाच्या जमीन व्यवहार प्रकरणावर अजित पवार संतापले, म्हणाले, या प्रकरणाशी माझा संबंध…


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 1800 कोटी किंमतीची सरकारी जमीन अवघ्या 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अखेरीस या प्रकरणावर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला एवढंच सांगायचं आहे. आता जे काही टीव्हीवर सुरू आहे. त्याबद्दलची मला काहीही माहिती नाही. त्या प्रकरणाचा अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही’ असं म्हणत पार्थ पवार यांना पाठीशी घालण्यास नकार दिला आहे.

तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की चौकशी करावी, असंही अजितदादा म्हणाले. मला एवढंच सांगायचं आहे. आता जे काही टीव्हीवर सुरू आहे. त्याबद्दलची मला काहीही माहिती नाही. त्या प्रकरणाचा अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही. मला ३५ वर्षांपासून महाराष्ट्राची जनता ओळखते.

त्यासंदर्भात या प्रकरणीची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागे एकदा अशाच प्रकारची माहिती माझ्या कानावर आली होती, त्यावेळी मी स्पष्ट केलं होतं, मला असं अजिबात चालणार नाही. कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये, आता परत काय झालं मला माहिती नाही.

पत्रकारांनी या जमीन व्यवहारात तुमच्या घराचा पत्ता आहे, असं विचारलं असतात अजितदादा म्हणाले की, ‘तो बंगला माझ्या नावावर नाही. पार्थ अजित पवार यांच्या नावावर तो बंगला आहे. तो पत्ता तिथला असून त्याचा आहे, असं म्हणत पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारात समोर आलेल्या पत्त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं.

‘⁠मूल मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात’ ‘महार वतनाची जमीन आहे का याची माहिती घेतोय. माझा या प्रकरणाचा दूरपर्यंत संबंध नाही. मी कुणाला मदत करावी अशी कधीही भूमिका घेतली नाही. ⁠मूल मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात. ⁠मी संविधानाला मानणारा माणूस, मी कायद्याने चालणारा माणूस आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असंही अजितदादा म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!