Ajit Pawar : अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, दादांच्याच आमदाराच मोठं वक्तव्य….


Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केले आहे. अकोला येथे त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, हे आपले वैयक्तिक मत असले तरी पक्षाने यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.

यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. Ajit Pawar

अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं.हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करावा. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील. दोन्ही नेत्यांमध्ये दुवा होण्याची संधी मिळाल्यास स्वत:ला भाग्यवान समजेल. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!