Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार सुधार!! कट होता होता वाचलास…, अजित पवारांनी गिरीश महाजन यांना सभागृहात लावला टोला..


Ajit Pawar : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे अजित पवारांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.

भाजपचे राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य मनीषा कायंदे, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. आवाजी मतदानाने राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांची भाषणे झाली. Ajit Pawar

यादरम्यान अजित पवारांनी राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. रोहित पवारांच्या विरोधात लढत असलेल्या राम शिंदे यांच्यासाठी अजित पवार यांनी एकही सभा घेतली नाही आणि रोहित पवारांना फायदा झाला असा आरोप राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ते वक्तव्य पुन्हा एकदा उच्चारत अजित पवार यांनी शेरेबाजी केली.

दरम्यान, अजित दादा म्हणाले, जे झाले ते चांगले झाले. आता आपण सभापती झालात. जर तुम्ही निवडून आला असता, तर देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला मंत्रीपद दिले असते आणि तुम्हाला जर मंत्रीपद दिले असते, तर गिरीश महाजन यांचे मंत्रीपद गेले असते असे म्हणत त्यांनी गिरीश महाजनांकडे वळून, गिरीश.. आता तरी सुधार.. आता तरी सुधार, कट होता होता वाचलाय तू असे वाक्य वापरले आणि सभागृहात हास्याचा स्फोट झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!