Ajit Pawar : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचे नाव घेत नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली.
आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे ह नराधम होता, त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर संतप्त होते. महिला असुरक्षित म्हणून विरोधक ओरडत होते. Ajit Pawar
त्या विकृताने पोलीसाचे हत्यार घेवून पोलिसांवर फायारींग केले त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला मारला मी समर्थन करीत नाही त्याची चौकशी होईल. मात्र, आता याचे राजकारण विरोधक करत आहेत. मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नीही विकृत म्हणते, असे अजित पवारांनी म्हटलं आहे.