Ajit Pawar : अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ, कोर्टात हजर राहण्याचे समन्स, नेमकं प्रकरण काय?


Ajit Pawar महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच अनेक एक्झिट पोल्स समोर आले. या पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. अशातच आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. Ajit Pawar

नेमकं प्रकरण काय?

२०१४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते.

त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

दरम्यान, अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!