Ajit Pawar : माफ करा… अजित पवारांनी भरसभेत मागितली माफी, नेमकं काय घडलं?


Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा नाशिकला पोहोचली आहे. नाशिकमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी चक्क जनतेची माफी मागितली. सरकार चालवताना काही चुका झाल्या. त्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याने अजितदादा यांनी जनतेची माफी मागितली आहे.

आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय, तो लैच जोरात लागलाय. माफ करा, जो काम करतो तोच चुकतो. पण आम्ही बोध घ्यायचा असतो, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले “मी चांगले काम घेऊन तुमच्या पुढे आलोय. कांदा निर्यात बंदी करायची नाही यावर देखील आमचे एकमत झालेले आहे. लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे. चूक झाली माफ करा जो काम करतो तो चुकतो.

अबकी बार ४०० पार मुळे देखील झटका लागला कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी करायची नाही असे अजित पवार यांनी सांगितले. कांदा निर्यात बंदी निर्णयाचा फटका लोकसभेला बसल्याची कबुली देखील यावेळी अजित पवार यांनी दिली. Ajit Pawar

या सभेमध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे १७ ऑगस्टला खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर ही योजना सुरू ठेवायची असेल तर आम्हाला निवडून द्या असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.

अजित पवार म्हणाले,“लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या खात्यांची माहिती आमच्याकडे आली आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे. येत्या १७ तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!