Ajit Pawar : शरद पवार यांना भेटून अजितदादा अमित शहा यांच्या भेटीला, राजकारण नेमकं घडतंय काय?


Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अजित पवार आणखी काही दिवस विश्रांती घेतील आणि पवार कुटुंबीयांच्या दिवाळीसाठी बारामतीला जाणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने काल सांगितले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली.

ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याच सांगण्यात आले. पण या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आलाय. राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढतायत. कारण शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे चर्चांचा बाजार गरम आहे. Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी फूट पडली. सध्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आहेत. अजित पवार गट सत्तेत तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दोन्ही गटांनी आपपाला दावा सांगितला आहे.

दरम्यान, सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबद्दल सुनावणी सुरु आहे. दरम्यान अजित पवार काल दिल्लीला गेल्याने विविध चर्चा सुरु आहेत. अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याची देखील चर्चा होती.

पण काल अमित शाह यांच्याबरोबर भेटीचे जे फोटो समोर आलेत, त्यावरुन तरी असं वाटत नाही. अमित शाह यांच्या बरोबरच्या भेटीत मराठा आरक्षण आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. जवळपास ४५ मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!