Ajit Pawar : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!!! कार्यकर्त्यांकडून दादांना खास गिफ्ट, अजितदादांनी कार्यकर्त्यांला झापलं, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला. त्यासाठी ते आज बारामतीतील संयोग सोसायटी आणि त्यांच्या निवासस्थानी होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या हाती त्यांच्या नावाची एक पाटी दिली.
ही पाटी पाहताच दादांनी ती गळ्यात घातलेल्या शालने झाकली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधून गेले. या पाटीवर लिहिलं होतं, अजित आशाताई अनंतराव पवार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. ही पाटी पाहताच दादांना आता काय करावं असं झालं. मात्र त्यांनी एक युक्ती लढवली.
त्यांनी त्या पाटीवरील मुख्यमंत्री हा शब्द आपल्या शालने झाकून घेतला. तेव्हा कार्यकर्ते आणि पत्रकारांनी मुख्यमंत्री शब्द का झाकताय, दिसू द्या, असे म्हटले. कार्यकर्ते म्हणाले आमची तीच इच्छा आहे. मात्र दादांनी सगळ्यांना चांगलंच खडसावल. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली होती. Ajit Pawar
अजितदादांनी तो शब्द दिसू दिला नाही. तेव्हा आजितदादा म्हणाले, इच्छा आहे असं म्हणून जर कोणी मुख्यमंत्री झालं असतं तर आबादी आबाद झालं असतं. मॅजिक फिगर पण गरजेचं असतं. त्याला मॅजिक फिगर लागते. यावेळी त्यांनी १४५ या बहुमताच्या आकड्याचा उल्लेखही केला. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या दादा जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत.