अवघ्या ८ तासांत तब्बल २५० किलोमीटर प्रवास करुन लोणी काळभोर पोलीसांनी १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाच्या गुन्हयाचा लावला छडा


लोणी काळभोर : अवघ्या ८ तासांत तब्बल २५० किलोमीटर प्रवास करुन लोणी काळभोर पोलीसांनी १३ वर्षीय मुलीच्या अपहरणाच्या गुन्हयाचा छडा लावला असल्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ९ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारांस अपहरण झालेल्या मुलीची आजी सोसायटीतील सेक्युरिटीच्या केबिनची साफसफाई करीत असताना तिची नात पिडीत मुलगी ही केबिनचे बाहेर थांबलेली होती. मात्र काम संपवून आल्यानंतर आजीला तिची नातं दिसेनाशी झाली म्हणुन त्यांनी सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारांस त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला.त्यानंतर तक्रारदार महिलेकडे अधिक तपास करुन तांत्रिक विश्लेषण केले असता पिडीत मुलगी ही उस्मानाबाद येथे असल्याची माहीती मिळाली. पोलिसांनी थोडा ही वेळ न दवडता तात्काळ विशेष पथकाची नेमणुक करुन अवघ्या ८ तासांत २५० किलोमीटर सलग प्रवास करुन, पोलीस पथकाने उस्मानाबाद परिसरात तांत्रिक माहीतीच्या आधारे मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.

तरुणीच्या अपहरणकर्त्यांसही पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यानंतर पिडीत मुलीस सुखरुपरित्या तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले.तसेच ९ जानेवारी रोजी दिवसभरामध्ये थेऊर कोलवडी नदी ब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या महीलेचा जीव वाचविणे तसेच १३ वर्षीय पिडीत मुलीचा २५० किलोमीटर अंतर प्रवास करुन अवघ्या ८ तासांत शोध घेऊन तिचे आजीचे ताब्यात दिले या दोन्ही प्रकाराचे गांभीर्य राखुन लोणीकाळभोर पोलीसांनी उल्लेखनिय कामगिरी केली.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, मदतनीस पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार वणवे, पोलीस शिपाई कुलकर्णी, महिला पोलीस हवालदार निकुंबे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!